"या नभांनी या भुईला दान दयावे ,
आणि या मातितुनि चैतन्य गावे,
कोणती पुण्ये अशी येती फळाला ,
कोणती पुण्ये अशी येती फळाला ,
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे "
मनोरंजनातून..., अगदी सहज-सोप्या, आपुलकीच्या संवादातून माहितीचं,ज्ञानाचं आदानप्रदान....आणि याबरोबरच रसिक मनांची अभिरुची जपत स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं आहे.
आजच्या वेगवान जीवनशैलीत सुखद संगीतमय क्षणांची पखरण,...सुमधुर भावगीतं,दुर्मिळ नाट्यगीतं,
फोन- इन कार्यक्रमांतून आपलेपणाने संवाद साधणारे निवेदक,छोट्या दोस्तांसाठीचे रंजक कार्यक्रम,दर्जेदार कथा-कादंबऱ्यांचं अभिवाचन,विश्वासार्ह बातमीपत्र ,विविध क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती ,....अशी कार्यक्रमांची सकस मेजवानी ,म्हणजे आकाशवाणी !!!!
कळत-नकळत ताणांना हुलकावणी ....म्हणजे आकाशवाणी!!!
खूप खूप शुभेच्छांसह ......,
-मानसी .
No comments:
Post a Comment