Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 22 March 2013


"शोधयात्रा  _अनोख्या भारताची "

भारताच्या कानाकोपऱ्यातल्या, साध्यासुध्या कल्पक माणसामध्ये दडलेली वैज्ञानिक प्रतिभा हेरून, त्यांनी लावलेल्या छोट्या मोठ्या लोकोपयोगी संशोधनांना प्रोत्साहन देणारी संस्था _  National Innovation Foundation . इथल्या  यशोगाथांवर  आधारित मालिका . "शोधयात्रा  _अनोख्या भारताची"! विज्ञान प्रसार, नवी दिल्ली आणि आकाशवाणी  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही मालिका महाराष्ट्रातल्या दहा केंद्रांवरून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता.


३ १  मार्च ला  सकाळी साडेनऊ वाजता ऐका या मालिकेचा दुसरा भाग.  डास  मारण्याचं  यंत्र  आणि तरंगणारी साबणाची वडी  याविषयीची यशोगाथा . 
       

Wednesday, 20 March 2013

Photo of an event organised by AIR Pune on 20.03.2013

Memoirs...

Photo of an event organised by AIR Pune in year 2000

aakashwani programme 16 to 22


सूर आणि ताल जेव्हा एकत्र येतात तेव्हा संगीताचा अनोखा आविष्कार सादर होतो. याची अनुभूती रसिकांनी काल घेतली. निमित्त होते आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाचे. यामध्ये धृपद धमार महोत्सवाअंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या पूर्वाधात पुष्पराज कोष्टी यांचे सुरबहार वादन झाले. कोष्टी यांनी यावेळी सुरबहारवर राग पूर्वी सादर केला. आलाप जोड झाला नंतर रचना चौतालमध्ये निबद्ध होती. मोहन शाम शर्मा यांनी पखवाजवर साथ दिली. त्यांच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित उमाकांत आणि पंडित रमाकांत गुंदेचा या बंधूंनी सहगायन सादर केलं. अखिलेश गुंदेचा आणि डॉ. अनिल चौधरी यांनी त्यांना पखवाजवर साथ केली; तर तानपुर्‍यावर बिल्वा द्रविड मोहळकर आणि भाग्यश्री गोसावी यांनी साथ केली. गुंदेचा बंधूंनी यावेळी राग रागेश्वरी आणि राग दूर्गामध्ये एक रचना प्रस्तुत केली. ताल चौतालमधील रागेश्वरी रागातील रचनेचे बोल होते ‘निरंजन निराकार परब्रह्म परमेश्वर’ तर सूरफाक्ता तालातील राग दुर्गामधील रचनेचे बोल होते ‘आदिशिवशक्ती’. 

   कालपासून सुरुवात झालेली ही विशेष कार्यक्रमांची मालिका दिनांक 22 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. आकाशवाणीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
   यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख रविंद्र खासनीस, निदेशक अभियंता रविंद्र काटकर, डॉ. सुनिल केशव देवधर, माजी केंद्र संचालक पतंजलि मादूसकर आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने रसिकप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.  
Aाज (दि. 17 मार्च) रोजी सकाळच्या सत्रामध्ये 10ः00 वाजता कार्यक्रमात बहाउद्दीन डागर यांचे रुद्रवीणा वादन आणि पं. निर्माल्य डे यांचं गायन सादर होणार असून सायंकाळच्या सत्रामध्ये 06ः00 वाजता पं. रामाशिष पाठक यांचे पखवाज वादन आणि पं. अभय नारायण मलीक यांचे गायन श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कलमाडी हायस्कूल, एरंडवणा, पुणे येथे सादर होणार आहे.
17.03.2013 रोजी सायंकाळच्या सत्रात झालेल्या  
स्थळ ः श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कलमाडी हायस्कूल, एरंडवणा, पुणे
आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त दि. 16 ते 22 मार्चपर्यंत विशेष कार्यक्रमांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
यामध्ये ‘‘धृपद धमार’’ महोत्सवाअंतर्गत आज रविवार दि. 17 मार्च रोजी सायंकाळच्या सत्रात संगीतातील मान्यवर व्यक्तींचे पखवाज वादन आणि गायन असे विविध कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी सादर झाले. महाराष्ट्रातील जनता संगीतप्रेमी असून धृपदाची 400 वर्षांपासूनची संगीत परंपरा पुढे जिवंत ठेवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पंडित अभय नारायण मलीक यांनी काल पुण्यात केलं.
 आज सायंकाळच्या सत्रातील पूर्वार्धात पंडित रामाशिष पाठक यांचे पखवाज वादन झाले. त्यामध्ये त्यांनी ताल ‘चौताल’चे विविध कंगोरे सादर केले. त्यामध्ये भैय्यालाल घराण्याची धुमकिटीचाही समावेश होता. पंडित रामाशिष पाठक हे दरभंगा शैलीचे महान पखवाजवादक असून संगीत अकादमीतर्फे 1996 साली त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पाठक यांचे सुपूत्र आणि शिष्य संगीतकुमार पाठक तसंच ज्येष्ठ शिष्य डॉ. अनिल चौधरी यांनी पखवाजवर साथ दिल्याने पखवाज वादनाच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती रसिक श्रोत्यांना मिळाली. तानपुर्‍यावर मयूर महाजन आणि लतेश पिंपळघरे यांनी साथ दिली, तर तरुण वादक राजीव तांबे यांनी हार्मोनियमवर लहरा साथ दिली. 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दरभंगा घराण्याचे पंडित अभय नारायण मलीक यांचे गायन झाले. धृपद गायकीची पार्श्र्वभूमी असलेले मलीक यांचे आकर्षक नादात्मकता हे गायनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे सुपूत्र आणि शिष्य संजयकुमार मलीक हे सहगायक होते. यावेळी पखवाजवर होते पंडित उदयकुमार मलीक. सारंगीवर साथ दिली पंडित संतोषकुमार मिश्र यांनी तर तानपुर्‍यावर बिल्वा द्रविड मोहोळकर आणि सुमित आनंद पांडे यांनी संगत दिली.
मलिक यांनी प्रथम भूप कल्याण रागात शृंगारिक धृपद सादर केले. त्यानंतर रागेश्वरीमध्ये धमार सादर केला. त्यांनी आपल्या गायनाचा समारोप राग ‘बसंत’ने केला. संगीत क्षेत्रातल्या या दिग्गजांच्या पखवाज वादन आणि गायनाने केवळ जाणकारच नाही तर सामान्य रसिकही मंत्रमुग्ध झाले. 
ही संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवता येत आहे ती आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमुळे.
  
19.03.2013 रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी

   कवी कविता का लिहितो, तर मन रितं करण्यासाठी. पुन्हा पुन्हा भरून येणं आणि रितं होणं हे एका समृद्ध कविचं लक्षण आहे. त्यापैकीच एक कवी म्हणजे कै. दत्ता हलसगीकर. वास्तवाला हस्तांदोलन, जीवनातील सर्व रसांशी एकरूप होणं, प्रेमभावना आणि प्रचंड आशावाद ही कवी हलसगीकर यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यांचा आस्वाद आज रसिकांना ‘‘शुभंकराचा सांगाती’’ या कार्यक्रमादरम्यान घेता आला. निमित्त होतं आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रम मालिकेचं.
मालिकेच्या आजच्या तिसर्या दिवसाच्या सत्रात कवी दत्ता हलसगीकर यांच्या कवितांवर आधारित ‘‘शुभंकराचा सांगाती’’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान कवी दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचं वाचन, गायन आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचं सादरीकरण करण्यात आलं. त्यामुळे रसिकांनाकवितेचं गाणंया संकल्पनेचा सुखद अनुभव घेता आला.
   ‘विरक्त होऊन मी जे पेरतो’, ‘पावलाखाली सूर्य झाकून तो चाललाय’, ‘पैशाचा मोह असा की सूर्यही झाकला जातोययांसारख्या आशयघन कवितांचं वाचन कवी संदीप खरे, वैभव जोशी, धीरेश जोशी, अरुण म्हात्रे, मुग्धा गोडबोले, राजेश देशमुख यांनी केलं. ‘झपझप चाललेत नाजूक पायया कवितेने रसिकांची विशेष दाद मिळविली. ‘सावळा ईश्वर’, ‘सावळीसी माया’, ‘खूप होते बोलायचेया गाण्यांचं गायन अनुराधा कुबेर, ‘नाते देवाशी जोडले’ - प्रज्ञा देशपांडे, ‘मी रानगंध प्यालेला’, ‘सखी तुझीया रूपापरी’ - राजेश दातार, तर सावनी रवींद्र यांनीमामाचा गावआणिपाऊस धारांचा धारांचाया कवितांचं गायन केलं. ‘चांदिची जोडवी घालताना’, ‘घराच्या सुखासाठी तू उपास-तापास करतेस’, ‘निरोप देताना दाराच्या चौकटीत उभी राहतेसया कवितांच्या कणिकांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. कवी दत्ता हलसगीकर यांच्या आठवणींना यावेळी अरुण म्हात्रे आणि सुविद्य प्रकाशनचे बाबूराव मैंदर्गीकर यांनी उजाळा दिला.  
या कार्यक्रमाचं संहिता लेखन आणि दिग्दर्शन डॉ. माधवी वैद्य यांनी केलं होतं तर संकल्पना आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम अधिकारी रवींद्र खासनीस यांची होती.
ही कार्यक्रम मालिका येत्या 22 तारखेपर्यंत सुरू राहणार असून त्यात रसिकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. उद्या म्हणजे बुधवारच्या सत्रातमृदगंधाहा इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी 0530 वाजता सादर करण्यात येणार आहे तर गुरूवारी आणि शुक्रवारी अनुक्रमे युवा तरंग जय भारत वंदे मातरम्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
   आजच्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख रवींद्र खासनीस, कार्यक्रम अधिकारी प्रदीप हलसगीकर, अरुण सोळंकी, डॉ. सुनिल केशव देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. अंजली लाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Saturday, 16 March 2013

जागतिक चिमणी दिनानिमित्त , २० मार्चला युववाणीत एक इंटरेस्टिंग कार्यक्रम !



नामशेष  होत चाललेल्या या चिमुकल्या पक्ष्याच्या  संवर्धनासाठी

विशेष प्रयत्न करणारा ,निमगाव केतकी , तालुका इंदापूर  इथला तरुण

राहुल लोणकर  याच्याशी मनमोकळ्या गप्पा जरूर ऐका  आणि

तुम्हीही तसे प्रयत्न करा .

राहुलची मुलाखत ,युववाणीत ,२० मार्चला ,सकाळी ९ वा . १० मि 

Friday, 15 March 2013

Zinda Kahaniya .. in the making

Writer  of  Radio  serial  Zinda  Kahaniya  Dr.  Shashikala  Rai ,  Producer  of  the  Programme  Dr.  Sunil  Kesha  Deodhar  with  SNEHALA  founder  Dr.  Girish  Kulkarni  at  Snehalaya  campus ,  Ahmednagar.Do  listen  to  the  programme  Zinda  Kahaniya @ 9.30 a.m. on  Pune  Vividh  Bharati  &  @ 8.40 a.m.  on  Medium  Wave  (  792  khzs. )  every  Thursday .  The  programme  will  definitely  sensitize  the  listener . 
‘ संगीत कथा ही बिलासखानी तोडीची’
या संगीत नाटकाचं 2 भागात पुणे केंद्रावरून प्रसारण दि. 18 आणि 25 मार्च 13 रोजी 
रात्री 9.30. ते 10.30 या वेळात.
मूळ लेखन – रणजित देसार्इ
रूपांतर – डॉ. अ.शं. परांजपे
संगीत – शरदराव जोशी
प्रमुख भूमिका – रविंद्र कुलकर्णी,अस्मिता चिंचाळकर, .ऋषिकेश बडवे
निर्मिती – कलापिनी नाटयसंस्‍था, तळेगाव.

            

             378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17.3.2013 चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.10 वा.
भावांजली – वासुदेवानंद सरस्‍वती ‘ टेंबेस्‍वामी रचित अघोरकष्‍टोदधरण स्‍तोत्राचा भावार्थ
 स्‍तोत्रगायन –  वैभवी शेटे, निवेदन –  मोरेश्‍वर देवधर,    निरूपण – डॉ. हेमा क्षीरसागर , सादरकर्ते – नीलिमा पटवर्धन
स. 9. 00 वा.
विशेष कार्यक्रम – संतवाणी : मुक्‍ताबाई यांचा अभंग रचनावर आधारित  संहिता – डॉ. अशोक कामत, संगीत – मुकुन्‍द गद्रे, निवेदन आणि सादरकर्ते –  डॉ. सुनील केशव देवधर  
स. 9. 30 , दु 1.50
ते सांय. 5.00 वा
किंवा खेळसंपेपर्यत
भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्‍यान मोहाली इथं खेळल्‍या जात असलेल्‍या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्‍यांच्‍या चौथ्‍या दिवशीच्‍या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्षवर्णन
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या
सा. 7. 15. वा.
माझे घर माझे शेत – किर्तन- रेशीम मुकुंद खेडकर  
रा. 8. 15 . वा.
एैलतीर पैलतीर – साठी नंतरची सांधेदुखी – 
डॉ. ऋषिकेश सराफ यांची मुलाखत
रा. 8.30 वा.
विधीमंडळाच साप्‍ताहिक समालोचन
रा. 9.30 . वा.
रविवासरीय संगीत सभा – असीम चौधरी – सतारवादन