Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday 20 March 2013

aakashwani programme 16 to 22


सूर आणि ताल जेव्हा एकत्र येतात तेव्हा संगीताचा अनोखा आविष्कार सादर होतो. याची अनुभूती रसिकांनी काल घेतली. निमित्त होते आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाचे. यामध्ये धृपद धमार महोत्सवाअंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या पूर्वाधात पुष्पराज कोष्टी यांचे सुरबहार वादन झाले. कोष्टी यांनी यावेळी सुरबहारवर राग पूर्वी सादर केला. आलाप जोड झाला नंतर रचना चौतालमध्ये निबद्ध होती. मोहन शाम शर्मा यांनी पखवाजवर साथ दिली. त्यांच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित उमाकांत आणि पंडित रमाकांत गुंदेचा या बंधूंनी सहगायन सादर केलं. अखिलेश गुंदेचा आणि डॉ. अनिल चौधरी यांनी त्यांना पखवाजवर साथ केली; तर तानपुर्‍यावर बिल्वा द्रविड मोहळकर आणि भाग्यश्री गोसावी यांनी साथ केली. गुंदेचा बंधूंनी यावेळी राग रागेश्वरी आणि राग दूर्गामध्ये एक रचना प्रस्तुत केली. ताल चौतालमधील रागेश्वरी रागातील रचनेचे बोल होते ‘निरंजन निराकार परब्रह्म परमेश्वर’ तर सूरफाक्ता तालातील राग दुर्गामधील रचनेचे बोल होते ‘आदिशिवशक्ती’. 

   कालपासून सुरुवात झालेली ही विशेष कार्यक्रमांची मालिका दिनांक 22 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. आकाशवाणीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
   यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख रविंद्र खासनीस, निदेशक अभियंता रविंद्र काटकर, डॉ. सुनिल केशव देवधर, माजी केंद्र संचालक पतंजलि मादूसकर आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने रसिकप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.  
Aाज (दि. 17 मार्च) रोजी सकाळच्या सत्रामध्ये 10ः00 वाजता कार्यक्रमात बहाउद्दीन डागर यांचे रुद्रवीणा वादन आणि पं. निर्माल्य डे यांचं गायन सादर होणार असून सायंकाळच्या सत्रामध्ये 06ः00 वाजता पं. रामाशिष पाठक यांचे पखवाज वादन आणि पं. अभय नारायण मलीक यांचे गायन श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कलमाडी हायस्कूल, एरंडवणा, पुणे येथे सादर होणार आहे.
17.03.2013 रोजी सायंकाळच्या सत्रात झालेल्या  
स्थळ ः श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कलमाडी हायस्कूल, एरंडवणा, पुणे
आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त दि. 16 ते 22 मार्चपर्यंत विशेष कार्यक्रमांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
यामध्ये ‘‘धृपद धमार’’ महोत्सवाअंतर्गत आज रविवार दि. 17 मार्च रोजी सायंकाळच्या सत्रात संगीतातील मान्यवर व्यक्तींचे पखवाज वादन आणि गायन असे विविध कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी सादर झाले. महाराष्ट्रातील जनता संगीतप्रेमी असून धृपदाची 400 वर्षांपासूनची संगीत परंपरा पुढे जिवंत ठेवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पंडित अभय नारायण मलीक यांनी काल पुण्यात केलं.
 आज सायंकाळच्या सत्रातील पूर्वार्धात पंडित रामाशिष पाठक यांचे पखवाज वादन झाले. त्यामध्ये त्यांनी ताल ‘चौताल’चे विविध कंगोरे सादर केले. त्यामध्ये भैय्यालाल घराण्याची धुमकिटीचाही समावेश होता. पंडित रामाशिष पाठक हे दरभंगा शैलीचे महान पखवाजवादक असून संगीत अकादमीतर्फे 1996 साली त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पाठक यांचे सुपूत्र आणि शिष्य संगीतकुमार पाठक तसंच ज्येष्ठ शिष्य डॉ. अनिल चौधरी यांनी पखवाजवर साथ दिल्याने पखवाज वादनाच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती रसिक श्रोत्यांना मिळाली. तानपुर्‍यावर मयूर महाजन आणि लतेश पिंपळघरे यांनी साथ दिली, तर तरुण वादक राजीव तांबे यांनी हार्मोनियमवर लहरा साथ दिली. 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दरभंगा घराण्याचे पंडित अभय नारायण मलीक यांचे गायन झाले. धृपद गायकीची पार्श्र्वभूमी असलेले मलीक यांचे आकर्षक नादात्मकता हे गायनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे सुपूत्र आणि शिष्य संजयकुमार मलीक हे सहगायक होते. यावेळी पखवाजवर होते पंडित उदयकुमार मलीक. सारंगीवर साथ दिली पंडित संतोषकुमार मिश्र यांनी तर तानपुर्‍यावर बिल्वा द्रविड मोहोळकर आणि सुमित आनंद पांडे यांनी संगत दिली.
मलिक यांनी प्रथम भूप कल्याण रागात शृंगारिक धृपद सादर केले. त्यानंतर रागेश्वरीमध्ये धमार सादर केला. त्यांनी आपल्या गायनाचा समारोप राग ‘बसंत’ने केला. संगीत क्षेत्रातल्या या दिग्गजांच्या पखवाज वादन आणि गायनाने केवळ जाणकारच नाही तर सामान्य रसिकही मंत्रमुग्ध झाले. 
ही संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवता येत आहे ती आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमुळे.
  
19.03.2013 रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी

   कवी कविता का लिहितो, तर मन रितं करण्यासाठी. पुन्हा पुन्हा भरून येणं आणि रितं होणं हे एका समृद्ध कविचं लक्षण आहे. त्यापैकीच एक कवी म्हणजे कै. दत्ता हलसगीकर. वास्तवाला हस्तांदोलन, जीवनातील सर्व रसांशी एकरूप होणं, प्रेमभावना आणि प्रचंड आशावाद ही कवी हलसगीकर यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यांचा आस्वाद आज रसिकांना ‘‘शुभंकराचा सांगाती’’ या कार्यक्रमादरम्यान घेता आला. निमित्त होतं आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रम मालिकेचं.
मालिकेच्या आजच्या तिसर्या दिवसाच्या सत्रात कवी दत्ता हलसगीकर यांच्या कवितांवर आधारित ‘‘शुभंकराचा सांगाती’’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान कवी दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचं वाचन, गायन आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचं सादरीकरण करण्यात आलं. त्यामुळे रसिकांनाकवितेचं गाणंया संकल्पनेचा सुखद अनुभव घेता आला.
   ‘विरक्त होऊन मी जे पेरतो’, ‘पावलाखाली सूर्य झाकून तो चाललाय’, ‘पैशाचा मोह असा की सूर्यही झाकला जातोययांसारख्या आशयघन कवितांचं वाचन कवी संदीप खरे, वैभव जोशी, धीरेश जोशी, अरुण म्हात्रे, मुग्धा गोडबोले, राजेश देशमुख यांनी केलं. ‘झपझप चाललेत नाजूक पायया कवितेने रसिकांची विशेष दाद मिळविली. ‘सावळा ईश्वर’, ‘सावळीसी माया’, ‘खूप होते बोलायचेया गाण्यांचं गायन अनुराधा कुबेर, ‘नाते देवाशी जोडले’ - प्रज्ञा देशपांडे, ‘मी रानगंध प्यालेला’, ‘सखी तुझीया रूपापरी’ - राजेश दातार, तर सावनी रवींद्र यांनीमामाचा गावआणिपाऊस धारांचा धारांचाया कवितांचं गायन केलं. ‘चांदिची जोडवी घालताना’, ‘घराच्या सुखासाठी तू उपास-तापास करतेस’, ‘निरोप देताना दाराच्या चौकटीत उभी राहतेसया कवितांच्या कणिकांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. कवी दत्ता हलसगीकर यांच्या आठवणींना यावेळी अरुण म्हात्रे आणि सुविद्य प्रकाशनचे बाबूराव मैंदर्गीकर यांनी उजाळा दिला.  
या कार्यक्रमाचं संहिता लेखन आणि दिग्दर्शन डॉ. माधवी वैद्य यांनी केलं होतं तर संकल्पना आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम अधिकारी रवींद्र खासनीस यांची होती.
ही कार्यक्रम मालिका येत्या 22 तारखेपर्यंत सुरू राहणार असून त्यात रसिकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. उद्या म्हणजे बुधवारच्या सत्रातमृदगंधाहा इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी 0530 वाजता सादर करण्यात येणार आहे तर गुरूवारी आणि शुक्रवारी अनुक्रमे युवा तरंग जय भारत वंदे मातरम्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
   आजच्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख रवींद्र खासनीस, कार्यक्रम अधिकारी प्रदीप हलसगीकर, अरुण सोळंकी, डॉ. सुनिल केशव देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. अंजली लाळे यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment