युववाणीतील विशेष मालिका "जाणीव- बौद्धिक संपदेची "
"भारतातल्या युवकांमध्ये उत्तम कल्पनाशक्ती आहे ,पण आपल्या बौद्धिक संपत्तीबाबत ते जागरूक नाहीत "- आपल्या राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली ही खंत खूप बोलकी आहे . संपूर्ण जगभरातून फाईल होणाऱ्या पेटंटच्या संख्येत ,क्षमता असूनही ,भारतीयांची संख्या खूप कमी आहे : म्हणूनच खास युववाणी तील मालिका "जाणीव- बौद्धिक संपदेची " दर गुरुवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी .
पेटंट ,कॉपी राईट ,ट्रेड मार्क , भौगोलिक निर्देश (पुणेरी पगडी , कोल्हापुरी गूळ , पैठणी , महाबळेश्वरची स्ट्राबेरी , यासारख्या स्थानिक महत्वाच्या गोष्टींचं आंतरराष्ट्रीय बाजारातलं महत्व ) याविषयीची सखोल माहिती , बौद्धिक संपदेचे प्रकार ,पेटंट च्या क्षेत्रातील करियर संधी , कल्पना ते पेटंट हा प्रवास या साऱ्या विषयी या मालिकेत तत्ज्ञांकडून ऐका , दर गुरुवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी.
तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता , तुमचे प्रश्न पाठवून , यासंदर्भात तुम्हाला अपेक्षित असलेले अजून काही उपविषय सुचवून ! या मालिकेच्या शेवटच्या प्रश्नोत्तरांच्या भागात त्याचा समावेश होईल .
Very informative
ReplyDelete